Summary of the Book
कथा लिहिणे हे लेखकाचे कसब असते. त्याचे अनुभव, विचार, कल्पना यांची सरमिसळ त्यात असते. या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. गंगाधर गाडगीळ यांच्या कथांनी १९४१ पासून वाचकांना आनंद दिला आहे. उन्हे आणि पाऊस या संग्रहातील कथा त्यांच्या अखेरच्या काळात लिहिल्या असल्या तरी त्यात त्यांची सर्व वैशिष्ट्ये आहेत. सामन्यांच्या जिवनाशी निगडीत या कथा आहेत. आई, पत्नी, शेजारी, मित्र-मैत्रीण असे विविध नातेसंबंध, कॉलेज जीवन, आपण राहतो तो परिसर, प्रवृत्तीनंतरचे जीवन या विषयांवरील या कथा आपल्याशा वाटतात.