Summary of the Book
देवदत्त ...! प्रेमळ,तितकाच शूर.निगर्वी तसाच निश्चयी .युवराज सिद्धार्थापेक्षा कशात उणा होता तो ? कुशल योद्धा ...राजकारणाची सजग जाण असलेला... प्रचंड बुद्धिमान...! त्याच्या देसनेची प्रशंसा तर स्वतः तथागतांनी केलेली .सिद्धार्थाच्या अगदी खालोखाल .काही बाबतीत समान तर क्वचित उजवाही .मग आज अशी अवस्था का व्हावी त्याची ?अंगच्या गुणांना काहीच मोल नसावं ? देवदत्त चुकला ,पणकुठे ?जेव्हा त्याने तथागतांवर नालगिरी सोडला ,डोंगरावरून शिळा ढकलली ,तेव्हा ?कि संघ भेद केला तेव्हा ?कुणी सांगावं ?इतिहास तर केवळ चूकाच पाहिल. त्यावरून त्याचं मूल्यमापन केलं जाईल . खलपुरूषच मानतील पुढच्या पिढ्या त्याला .मग भलेही तथागतांनी त्याचं शत्रुत्व स्वीकारलं नसेल .देव आणि तथागत म्हणजे दोन टोकं .एक उज्ज्वल प्रकाश तर दुसरा पाताळगर्भ अंधःकार .एक सुगत तर दुसरा अधोगत.त्याच्या बुद्धिला असं कोणत ग्रहण लागलं की चांगलं-वाईट यातला फरकच कळू नये ?जे उपालीला कळालं ,अंगुलीमालासारख्या दरोडेखोराला उमजलं ,ते देवदत्तला समजूनये ? की जाणूनच त्याने तो मुक्तीचा प्रकाश आपल्या हृदयात प्रवेशू दिला नाही?