Summary of the Book
गेल्या चार वर्षांपासून साप्ताहिक साधना आपल्या मुख्य दिवाळी अंकासोबत नऊ ते पंधरा वषेर् वयोगटातील मुलांसाठी बालकुमार विशेषांक सादर करत आहे. मान्यवरांनी खास या वयोगटासाठी लिहिलेले लेख, आकर्षक सजावट आणि वाजवी किंमत हे वैशिष्ट्य अंकाने यंदाही जपले आहे. गुलजार यांची अनुवादित कथा, आईने केलेल्या जडणघडणीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी केलेले कथन, अरुणा ढेरे यांनी सांगितलेल्या त्यांचे वडील लोकसंस्कृतीचे अभ्यासक रा.चिं. ढेरे यांच्या बालपणीच्या आठवणी याशिवाय अनिल अवचट, अरुणा ढेरे, दासू वैद्य, राजन गवस, ज्ञानेश्वर मुळे, रघुनाथ माशेलकर आदी मान्यवरांच्या कथा, लेख यात आहेत.