Summary of the Book
मुलाखत हा मुलाखत देणाऱ्यासाठी आणि घेणाऱ्यासाठीही एक अविस्मरणीय अनुभव असतो. मुलाखत घेणाऱ्याचा संबंधित व्यक्ती आणि व्यक्तीचे कार्यक्षेत्र या दोहोंचा चांगला अभ्यास असेल, तर मुलाखत रंगते आणि ऐकणाऱ्याला आनंद देते. तसाच काहीसा अनुभव स्वाती कर्वे यांनी घेतलेल्या मुलाखातीमधून येतो.
त्यांच्या मुलाखतवजा लेखांचा हा संग्रह आहे.
मंगेश तेंडुलकर, अलका देव- मारुलकर, फैय्याज, पु. ल. देशपांडे, दीपा लागू, अरुण नूलकर, गंगाधर महाम्बरे, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी, रमाकांत पराजंचे,
सुचेता भिडे-चापेकर, श्रीकांत मोघे आदींची व्यक्तीचित्रे या लेखांमधून समोर येतात. या सर्वांची व्यक्तिमत्वे, त्यांची जडण-घडण, त्यांना आलेले अनुभव,
त्यांचे काम याविषयी माहिती मिळते.