Summary of the Book
संस्कृतमधील योगवासिष्ठ ग्रंथाचे हे मराठी रूपांतर. योगवासिष्ठ हा ग्रंथ म्हणजे वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्र यांना जो उपदेश केला तो होय. या ग्रंथात वसिष्ठांनी रामचंद्रांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना बुद्धिनिष्ठ उत्तरे दिली आहेत. केवळ आध्यात्मिकदृष्ट्या या ग्रंथांचे महत्त्व आहे असे नाही, तर प्रयत्नवादावर विश्वास असणाऱ्या सर्वच मंडळींनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा असा आहे. योगवासिष्ठवर मराठीत अन्यही काही पुस्तके व मोठे ग्रंथ उपलब्ध आहेत, पण ते एक तर खूप मोठे किंवा मग अगदी परिचयात्मक असे आहेत. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधेल व योगवासिष्ठ या ग्रंथाची नेमकी कल्पना येऊ शकेल, अशा स्वरूपाने या ग्रंथाची निर्मिती केली आहे. मूळ ग्रंथातील सर्व कथा, तसेच उपदेशाचा भाग आणि तत्त्वज्ञान याचा समावेश या ग्रंथात आहेच. केवळ योग असा शब्द असल्याने या ग्रंथाबद्दल अनेकांचा गैरसमज होतो, पण वसिष्ठ ऋषींनी हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आचार्य किशोर व्यास यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे.