Summary of the Book
राजकारणातील डावपेच, उलाढाली, पडद्यामागील घटना, नाट्य, सत्तेसाठी होणारी रस्सीखेच हा नेहमीच लोकांच्या कुतहलाचा विषय राहिला आहे. त्यामुळेच राजकारण हा आजवर अनेक कथाकादंबऱ्यांचा विषय बनलेला असला तरी नवनवी पात्रे, घटना येत असल्यामुळे वाचक सत्ताकारणावरील नव्या कादंबऱ्यांना कंटाळत नाहीत. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक भालचंद्र देशपांडे यांची 'राजधर्म' ही नवी राजकीय कादंबरी.