Summary of the Book
‘माझे वडील’ या विषयावरील लेखांमधून वडिलांविषयी कृतज्ञता भावनेने लिहिणाऱ्या २५ ते ३० वयोगटातील मुलामुलींपासून ६० ते ७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींच्या लेखांचा ‘शब्दगांधार’मध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विविध विषयांवरील लेख, कथा, कवितांच्या माध्यमातून शब्दगांधार साकार झाला आहे.
सत्त्वशीला सामंत यांचा नावात काय आहे?, अनुराधा राजहंस यांचा बालगंधर्वाच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि नदीकिनारी हा डॉ. यू. म. पठाण यांचा लेख आदी लेख विशेष वाचनीय. कुंकू, विधिलिखित, आजचा दिवस या कथांबरोबरच डॉ. शंतनू चिंधडे, रजनी दाते, अरविंद हर्षे, दीपक करंदीकर यांच्या कविता दाद घेऊन जाणार्या आहेत.