एके काळी साठी पूर्ण करणाऱ्या माणसाचे कौतुक होत असे; पण आता माणसे सहजपणे ८० वर्षापर्यंत जगतात. मात्र या काळात त्यांना आर्थिक, घरगुती, आरोग्य, वाहन चालविणे अशा अनेक बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यातून मार्ग काढत आनंदाने कसे जगावे, त्यासाठी काय पथ्ये व कुपथ्ये आहेत, याचे अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर व्यक्तींच्या लेखांचा संग्रह 'वृद्धत्व (६०+) आनंदी कसे करावे' हा ज्येष्ठ साहित्यिक व करसल्लागार अरुण रामकृष्ण गोडबोले यांनी संपादित केला आहे. यातील विविध लेखांत आरोग्य, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर लेखकांनी 'युक्तीच्या चार गोष्टी' सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही गोष्टी वृद्धत्वापुर्वी अंमलात आणण्याच्या व काही ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर बोलणे-वागणे व कृतीसाठी आहेत. ज्येष्ठांचे ड्रायव्हिंग यावरील खास लेखही यात आहे. जेष्ठांना अतिशय उपयुक्त ठरणारे ३२ लेख यात आहेत ज्याद्वारे रडत-कुढत जीवन जगण्यापेक्षा हसत-खेळत कसे जगावे याची गुरुकिल्ली यात सापडते.
‘वृद्धत्व आनंदी कसे करावे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4806948978603391293