Summary of the Book
संगणक युगात हाताने लिहिण्याचे प्रमाण कमी होतं चालले आहे. बहुतेक ऑफिस संगणकीकृत झाली आहेत. यात अनेक प्रकारच्या लिखाणाचा समावेश होतो. लिखाणानंतर ते सेव्ह करण्याची, त्याची फाईल करण्याची गरज असते. यालाच डेस्कटॉप पब्लिशिंग (डी. टी. पी.) म्हटले जाते.
ते मराठीतून शिकण्याची सोय नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी संपुर्ण डी. टी. पी. मध्ये करून डेली आहे. पेजमेकर, फोटोशॉप, कोरल ड्रॉ या तीन प्रणालीचा वापर डी. टी. पी. मध्ये केला जातो. त्यामुळे पेजमेकर ७.० या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती प्रथम दिली आहे. नवीन पान कसे तयार करायचे, हे शिकविल्यानंतर प्रत्येक टूल आणि कमांडचा वापर, व्हिजिटिंग कार्ड आणि लोगो, बिल्स, इनव्हॉइस आणि रिसीट्स, जाहिरात, लेअर्स, बुक वर्क, प्रिंटींग, मेन्यू यांचा वापर कसा, केव्हा करायचा या वर उदाहरणे आणि आकृत्यांसह मार्गदर्शन केले आहे.
त्यानंतर डी. टी. पी. ला पूरक कोरल ड्रॉ, फोटोशॉप यांची माहिती दिली आहे. वृत्तपत्राच्या दृष्टीने या गोष्टींचा वापर कसा करायचा, याविषयी संपुर्ण माहिती दिली आहे.