Summary of the Book
'विनोद' हा 'गुलाबराव पारनेरकर - भाग २' या पुस्तकाचा स्थायीभाव आहे परंतु त्याचे आत्मतत्त्व विनोदाच्या पलीकडे जाते. गुलाबरावांनी आयुष्यात मोठे आघात सोसले आहेत. गिरणी कामगार संपात त्यांना आपली नोकरी गमावावी लागली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अनुज याचा तरुणपणीच मृत्यू झाल्याचे असह्य दु:ख ते सहन करत आहेत. आपले दु:ख सांभाळतानाच आपली पत्नी खचून जाऊ नये याची ते सतत काळजी घेत आहेत. ते दोघे पती - पत्नी आपले दु:ख गोंजारत न बसता इतरांना आनंद देत आपला आनंद शोधायचा प्रयत्न करत जगत आहेत. गुलाबरावांच्या आयुष्यातल्या या कंगोऱ्यामुळे त्यांच्या वागणुकीतून निर्माण होणारा विनोद एका वेगळ्याच उंचीवर जातो. त्यांचा जगण्यातला उत्साह वाचकाला खोलवर भिडतो. गुलाबराव पारनेरकर ही विनोदी व्यक्तिरेखा म्हणून प्रभावी ठरत असतानाच नकळत ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनून जाते. हेच सचिन जगदाळेंच्या 'गुलाबराव पारनेरकर - भाग २' या पुस्तकाचे फार मोठे यश आहे.