Summary of the Book
क्षयरोगाबद्दल एके काळी समाजात प्रचंड भीती व अज्ञानही होते. आता या दोन्ही बाबी बऱ्याच कमी झाल्या आहेत. सांगलीतील चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. अनिल मडके यांनी या रोगाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या रोगाचा इतिहास, याबद्दलचे समज-गैरसमज, तसेच या रोगावरची औषधे, या औषधांचे साईड इफेक्ट्स, या रोगाची व्याप्ती या साऱ्या मुद्द्यांची योग्य ती माहिती देऊन त्यांनी या रोगाबद्दल काय काळजी घ्यायची, याचा सामना कसा करायचा याबद्दलची नेमक्या शब्दांत मार्गदर्शन केले आहे. कथनात्मक शैली आणि रुग्णांचे शंकानिरसन करण्यासाठी केलेला संवाद असा फॉर्म निवडून मडके यांनी हा रुक्ष व अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगितला आहे.