Summary of the Book
जन्म झाल्यावर लगेच बाळ बोलू लागले तर ? आयडिया थोडी विचित्र आणि काही तरी भितीदायक वाटते ना? पण तसे अजिबात नाही. उलट झंप्या झिम्माडे जन्मल्यानंतर लगेच आईशी बोलू लागला, याचे कारण तो पोटात असताना आईने मिनझिझिना यानातून परग्रहावर जाऊन आली होती. त्यामुळेच हा झंटू प्लॅटू चमत्कार झाला होता.
पुढे झंप्या अकरा वर्षांचा होतो. गोळे बाईंचा वाढदिवस तो शाळेत प्रो. छत्रे काकांच्या गाडीत साजरा करतो. हनुमंत आजोबांना जादूने जुन्या आठवणीत नेऊन तारुण्यातील शरयू आजीशी भेट घडवतो. त्याला ऋतुजाच्या रुपाने मैत्रीण भेटते.
झंप्याला जसा झंटू प्लॅटू चमत्कार करता येत होता, तसे ऋतूजाला प्राण्यांची भाषा समजत असे. त्यावरून झालेल्या अनेक गमतीजमती डॉ. विजया वाड यांच्या 'झंप्या झिम्माडे' या कथेत वाचायला मिळतात. झंप्या झंटू प्लॅटूवर गेल्यानंतर त्याला वरदान मिळते. त्याचा उपयोग तो सत्कार्यासाठी करतो. शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतो. टारगट मुलांचा बेत उधळून तो शाळेचे नुकसान थांबवितो. हे सर्व कसे घडते, हे वाचताना बाल वाचक व त्यांचे आईबाबाही या गोष्टीत रमून जातील.