Summary of the Book
उषा पुरोहित यांची ही सामाजिक कादंबरी आहे. शहरी मध्यमवर्गीय संस्कृती, जीवन कादंबरीतून समोर येते. स्वातंत्र्यपूर्व आणि तात्कालिक स्वातंत्र्योत्तर काळही दिसतो. 'भेद्य आहेत त्या माणसा-माणसांमध्ये उभ्या केलेल्या भिंती आणि अभेद्य आहेत, त्या समाजपुरुषाला कुटिलतेने अपमानित करणाऱ्या विषप्रवृत्ती.' असे लेखिका प्रस्तावनेत म्हणतात. या संकल्पनेवर आधारितच ही कथा आहे.
एका बाजूला विचारी व उदारमतवादी सवर्ण आणि त्याने पोटच्या पोरासारखा वाढवलेला मांगाचा मुलगा गणेश आणि त्याची बुद्धिमान आणि संतांचे शहाणपण अंगी असलेली आई आहेत. दुसऱ्या बाजूला स्वार्थी, अनीतिमान आणि पदासाठी सवर्णेत्तर मुलीचा उपयोग करून घेणारा सवर्ण आहे. तिसऱ्या बाजूला मुलीचा पिता आहे. या त्रिकोणावर कादंबरीचा पाया आहे.