क्रोमोझोम 6
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 495 R 371 / $ 6.30
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
वैद्यकीय पार्श्वभूमीवरील रहस्यमय कादंबर्‍या लिहिण्यात यशस्वी ठरलेल्या डॉ. रॉबिन कुक यांची ही सर्वाधिक खपाची उत्कृष्ट नवी कादंबरी. वास्तवदर्शी परखड लेखन या त्यांच्या वैशिष्ठ्याचा या कादंबरीत जागोजाग प्रत्यय येतो.

गुन्हेगारी विश्वातील कुप्रसिद्ध खतरनाक गुंड कार्लो फ्रॅन्कोनी याचा गोळ्या घालून खून करण्यात येतो आणि शवविच्छेदन होण्यापूर्वीच शहराच्या मुख्य शवागारातून त्याचा मृतदेह हातोहात नाहीसा केला जातो. या खळबळजनक घटनांमुळे पोलिस खाते चक्रावून गेले, तरी शवागारांतील निष्णात गुन्हेगारी रोगनिदानतज्ज्ञ, डॉ. जॅक स्टेपल्टनचे मात्र कुतूहल वेगळ्याच दिशेने जागृत होते.

काही काळातच पाण्यात तरंगताना सापडलेला एक मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शवविच्छेदनाच्या टेबलावर येतो. मृतदेहाचे हरवलेले डोके, हातपाय यापेक्षादेखील त्याच्या छिन्नविच्छिन्न केलेल्या यकृतामुळे डॉ. जॅकची उत्सुकता अधिकच डिवचली जाते.

तो मृतदेह हरवलेल्या फ्रॅन्कोनीचाच आहे, याची जॅक आपली सहाय्यक डॉ. लॉरी मॉन्टगोमेरी हिच्या मदतीने ओळख पटवतो. परंतु ओळख पटूनदेखील त्याचा रहस्यमय गुंता उलगडायला काहीच उपयोग होत नाही. कार्लो फ्रॅन्कोनीची हत्या कोणी केली? ज्याने खून केला त्यानेच तो मृतदेह शवागारांतून पळवून छिन्नविच्छिन्न केला असेल का? याचे कारण काय?.... या रहस्याचा मागोवा घेता घेता जॅक आणि लॉरी विषुववृत्तावरील आफ्रिकेच्या दुर्गम जंगलात पोचतात. प्रचलित आधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही अधिक विकसित शस्त्रक्रियांच्या सहाय्याने, रूढ वैद्यकीय नैतिक संकेत व मूल्यांना पायदळी तुडवणारा एक अभद्र व्यापारी कट तिथे शिजतोय, असं त्यांना आढळतं. हा व्यापारी कट कोणता? याचे बळी कोण?....

अतिशय रोमांचकारी, वेगाने घडत जाणार्‍या नाट्यपूर्ण भयानक घटनांमुळे क्रोमोझम्-6 ही कादंबरी अतिशय आकर्षक झाली आहे. ही कादंबरी वाचल्यानंतर यात वर्णन केलेल्या वैद्यकीय शक्यता अगदी नजीकच्या काळातही खर्‍या ठरू शकतील, याची भीषण जाणीव होते. डॉ. रॉबिन कुक यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण लेखणीने हे सारे अवकाश लीलया पेलले आहे."
Book Review
Write a review

Padmanabh Dajji
08 Jan 2015 05 30 AM

for this book i dont find a words. u have to only give a time for this book.,
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat