Summary of the Book
काशिनाथजी यांच्या सांगण्यावरून छोट्या नरेंद्रने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायाला सुरवात केली. तिथे त्याला शिस्तीचे महत्व कळले. त्याला वाचनाचा छंद लागला. पूर्ण वेळ संघप्रचारकाची जबाबदारी त्याने घेतली. आणीबाणीच्या काळात त्याचे गुण प्रकर्षाने दिसून आले. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. नरेंद्रचे गुण भाजपमध्ये उपयुक्त ठरतील हे बाळासाहेब देवरस यांच्या ध्यानात आले आणि लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनी त्याला पक्षात आणले.
येथून नरेंद्र मोदि यांच्या राजकीय वाटचालीला सुरवात झाली. २००१ मध्ये त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्याच्या विकासाचे स्वप्न पाहत असतानाच २००२ मध्ये गोध्रा कांड घडले. मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकामध्ये मोठा जनादेश मिळवून ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हा सर्व इतिहास व त्यांची कारकीर्द याचे चित्र डॉ. गिरीश दाबके यांनी नरेंद्रायण मधून केले आहे प्रचारक ते पंतप्रधानपद हा त्यांचा प्रवास कसा झाला याचे वस्तूनिष्ठ वर्णन यात आहे.