Summary of the Book
अनेक माणसांचा आपल्यावर प्रभाव असतो. त्यातील कित्येकांना आपण पाहीलेलेही नसते. तरी त्यांच्याबद्दल आदर, कुतूहल, आकर्षण, तर काही वेळा चक्क राग असतो. त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्नही होत असतो. अशा एक ना अनेक व्यक्तीमत्वांची ओळख कुमार केतकर यांनी ओसरलेले वादळ मधून करून दिली आहे. भारतीयांचे पितामह महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, श्रीपाद डांगे असे भारतीय नेते, तसेच लेनिन, गोर्बाचेव्ह, बिल क्लिंटन, फिडेल कॅस्ट्रो, यासर अराफात असे परदेशी नेते. फ्रॉईड, मदर तेरेसा, डायाना, अमर्त्य सेन, स्टीफन हॉकिंग, तसेच आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, नर्मदाशंकर दवे, डॉ. भा. ल. भोळे, डॉ. नीतू मांडके, अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती येथे आपल्याला भेटतात. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजतात.