Hard Copy Price:
25% OFF R 240R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
उच्च प्रतीचा कागद व रेखीव रचना असलेला शुभम् चा दिवाळी अंक मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचनीय आहे. सर्व कथा रंजक, माहिती उपयोगी व लेख अभ्यासपूर्ण आहेत. कवितांचीही निवड चांगली करण्यात आली आहे. त्यामानाने वार्षिक भविष्य मात्र सपक वाटले. एक चांगला अंक वाचकांना दिल्याबद्दल धन्यवाद.
- ज्येष्ठ गायिका मंगलाताई आपटे यांचा अभिप्राय
Mahendra Manohar Phate
13/11/2021
ॐ साईराम !
खूपच आनंदाची गोष्ट म्हणजे शुभम दिवाळी अंक घरपोच मिळाले ! खूप खूप धन्यवाद !
कविवर्य श्री. महेन्द्र फाटेजींची "वेगे धाव" कविता, अन कविवर्य श्री. सुधीरदादा आपटेजींची "विनंती" या दोन्ही कवनांच्या ब्रह्मस्वरूप शब्दांनी हृदयाच्या तळाशी जाऊन, हृदय अक्षरशः जागृत केलं !
जनता खाण्यापिण्यात, महागडे पिझाबर्गर घेण्यात, अन् ब्रांडेड कपड्यात अनाठायी धनव्यय करीत आहे, तो करणे अयोग्य आहे, अन् तो करू नये, असे अजिबात म्हणणे नाही. पण ... पण ... संतभूमीतील महाराष्ट्रीय जनतेने तरी "शुभम"सारखा संतसाहित्यात्मक, जीवन ख-या अर्थाने सुखी करणारा अंक विकत घेऊन, शुभदिवाळीत चविष्ट अशा कल्याणकारी साहित्यिक फराळापासून स्वतःच स्वतःला वंचित ठेऊ नका, एवढीच विनंती !
संपादिका सौ. मनीषा फाटे, समाजकार्याच्या भावनेने अपार परिश्रम घेऊन, हे कार्य करीत आहेत, ते सहजपणे होण्याजोगे नाही. समाजाने सहकार देणे अत्यावश्यक आहे.
राम कृष्ण हरि !
संत साहित्य अनमोल आहे, अन ते अल्प मूल्यात घरपोच मिळत आहे, हेच आपले अहोभाग्य आहे ! जय जगत !
- मधुकर अंबाडे, बडोदा, गुजरात