Summary of the Book
जीवनात यशस्वी व्हायला कुणाला आवडत नाही ? पण त्यासाठी प्रत्येकाला अथक प्रयत्न आणि जिद्दीची कास लागते . न डगमगता आत्मविश्वासाने वाटचाल करावी लागते . यश मिळवताना कितीही अडचणी किंवा समस्या समोर आल्या , तरीही घाबरून न जाता निश्चयाने जो पुढे जातो तोच यशस्वी ठरतो .
दृढ संकल्प ( अतूट निश्चय ) हाच एक मुख्य गुण आहे , ज्यामध्ये अनेक व्यक्ती मोठी कामे करून दाखवू शकतात . त्यांच्यात भलेही दुसरे गुण नसतील , त्यांच्यात कदाचित इतर दुर्गुण असतीलही ; परंतु अतूट निश्चय , सतत संघर्ष , सराव आणि वेगळे साहस यांच्या आधारावर ते नक्की विजयी होतात . कठोर परिश्रमामुळे ते कधीही निरुस्ताही होत नाहीत , कष्ट करायला कधी घाबरत नाहीत . संकटामुळे कधी निराशही होत नाही . वारंवार प्रयत्न करत राहतात , कितीही संकटे आली तरी त्यांच्या मार्गावर पुढे पुढेच जात राहतात . कारण , आपल्या ध्येयासाठी सतत काम कारत राहणे त्यांच्या स्वभावाचे अनिवार्य अंग असते .
प्रस्तुत पुस्तकात नेहमी प्रगती करण्यासाठी एकाहून एक सरस मार्ग सांगितले आहेत . विजयाचा संकल्प , संधीचे सोने , शक्तींचे भांडार , विनम्रता , दृढविचार , साहस , भाषणकौशल्य , स्वावलंबन इ . अशा प्रगतीच्या अनेक पायऱ्यांचा आपण वापर केल्यास आपल्याला निश्चितच यशप्राप्ती होईल . म्हणूनच जीवनात कधीही न थांबता यशाच्या दिशेने पुढे चला , चालतच रहा ....!