Summary of the Book
व्हिन्सेंट व्हॅन गॉग,अमृता शेर -गिल आणि प्रभाकर नाईक साटम हे भिन्न संस्कृतीत रुजलेले प्रतिभावंत आहेत.
व्हॅन गॉगच्या तजेलदार रंगांच्या आवेगपूर्ण फटकाऱ्यांमधील अस्वस्थता इम्प्रेशनिझमइतकीच त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या क्लेशदायक अनुभवांनी आलेली होती.
अमृता शेर-गिलने पाश्च्यात्य आधुनिल कलेचा प्रवाह भारतात आणला आणि आपल्या अल्प आयुष्यात मुक्त कलावंताचं जीवन ती जगली.
प्रभाकर नाईक साटम मूळचे कोकणातले ,पण जपानमध्ये त्यांनी टॅपेस्ट्री या कलाप्रकारात एक वेगळी कलात्मक उंची गाठली.
या तीनही प्रतिभावंतांच्या जीवनसंघर्षाचं कलात्मक दर्शन सतीश भावसार यांच्या 'तीन चित्रकार 'या पुस्तकात घडतं . व्हॅन गॉगवर पडलेला जपानी मुद्राचित्रांचा प्रभाव ,नाईक साटम ह्यांना लाभलेली जपानची कर्मभूमी आणि अमृता शेर-गिलने साधलेला पाश्च्यात्य आधुनिकता आणि पौर्वात्य परंपरा यांचा समतोल असं एक सांस्कृतिक अभिसरण इथे प्रत्ययाला येतं .