Summary of the Book
साध्या स्वयंपाकापासून निरनिराळे पदार्थ करण्याची आणि करून खायला घालण्याची आवड असणाऱ्या सर्वांनाच आवडेल असे हे पुस्तक.
जयश्री देशपांडे यांनी या पुस्तकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वैविध्यपूर्ण पदार्थ करायला शिकवले आहेत.
सूप्स, स्टार्टर्स, सॅलड, भाताचे प्रकार,पोळी व पोळीचे प्रकार, पालेभाज्या, नेहमीच्या भाज्या, भाज्यांचे वैशिष्ठ्यपूर्ण प्रकार, उसळी, आमटी,
सार, कढी अशा पारंपारिक पदार्थांच्या कृती दिल्या आहेत. मात्र पारंपारिक कृतींमध्ये थोडे बदल केले तर वेगळे बनतात, हेही त्यातून दिसते.
न्याहरीचे पदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ,चायनीज, कॉन्टिनेन्टल, भेळपुरी, असे पदार्थही पुस्तकांतून शिकता येतात. शिवाय वेगवेगळे मसाले, मुरांबे, लोणची, पापड यांच्या कृतीही करून पाहता येतील...