Summary of the Book
स्वतंत्रपणे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणाईची आणि असंख्य माणसांनी बनलेल्या व्यवस्थेची संघर्षमय कहाणी.
‘‘नव्या उद्योगाच्या खेळात एक रेस ट्रॅक असतो. त्यावर जीव तोडून धावणारा प्रत्येकाचा एक घोडा असतो. वेड्यासारखे पैसे फेकणारा एक जुगारी असतो. आणि कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तरी स्वत: नेहमीच जिंकणारा संयोजक असतो. आज तरी माझी भूमिका संयोजकाची होती. नंतर विराजच्या संपूर्ण उद्योगावर हक्क सांगता येईल. अशा प्रकारे व्यवहार करता येणं आज मला शक्य होतं.’’
- कृष्णरंग
‘‘हे द्वंद्व तुझं आणि कृष्णरंगाचं नाहीय, विराज. हे द्वंद्व दोन पिढ्याचं आहे. हे द्वंद्व भूतकाळ आणि भविष्यकाळाचं आहे.
- दळवीमास्तर
‘‘तुझा जन्म या देशात झालाय. पण तुझी वृत्ती इथल्या जगाशी मिळतीजुळती नाहीय. तुला आयुष्यभर झगडावंच लागेल इथे. तुझ्या वाट्याला कायम नैराश्यच येईल. तू माझ्याबरोबर चल, विराज. फ्रान्सला. युरोपमधल्या कुठल्याही देशात. तिथे माणूस माणसासारखं जगू शकतो.’’
- मिशेल लॅम्बार्ड
‘‘ ’Art is a lie that tells us the truth.’ पिकासोचे हे उद्गार अनंत सामंतांच्या कादंबरीला तंतोतंत लागू पडतात.’’
- दीपक घारे