Summary of the Book
स्वयंपाक करणे हे नित्याची गोष्ट असली तरी तो चवदार, सकस बनविणे ही एक कला आहे. विभक्त कुटुंब, नोकरी - व्यवसायाची धावपळ यामुळे मुलींचे स्वयंपाक शिकणे राहून जाते व विवाहानंतर ही गोष्ट जाणवायला लागते.
अशा वेळी मार्गदर्शक ठरणारे व अनेकविध रुचकर, चविष्ट पदार्थ व संपूर्ण स्वयंपाक कसा करावा हे सांगणारे 'स्वयंपाक ' हे पुस्तक प्रत्येकीने जवळ बाळगले पाहिजे. सिंधुताई साठे यांनी अत्यंत सोप्या भाषेत शेकडो पाककृती यात दिल्या आहेत.
पक्वान्ने, नाश्ता व मधल्या वेळचे पदार्थ, भात, पुलाव, खिचडी, आमटी, सुप, भाज्या, उसळी, चटण्या, कोशिंबिरी, सॅलड, लोणची, पापड, सांडगे, कुरड्या, उपवासाचे पदार्थ अशा नेहमीच्या पाककृती यात आहेतच.
तसेच चायनीज, बेकरीचे पदार्थ, केक - बिस्कीटे, आईस्क्रीम, मिल्कशेक, पुडिंग, स्क्वॅशेस घरी कसे बनवायचे हे सांगितले आहे. मांसाहारी पदार्थ व खास मधुमेहींसाठी, लहान मुलांसाठी आहारही सांगितला आहे.
गृहिणींसाठी छोट्या टिप्स, २५ माणसांसाठी पक्वन्नांसह स्वयंपाकाचा बेत, वाटी - चमचाच्या मापानुसार साहित्य सांगितले आहे. त्यानुसार स्वयंपाक केल्यास कुटुंबीय व पाहुणे नक्कीच तृप्त होतील.