Summary of the Book
चित्रांपासून ते मजकुरापर्यंत दर्जेदार आणि संग्राह्य़तेची सारी वैशिष्ट्ये जपणार्या मोजक्या दिवाळी अंकांमध्ये दीपावलीचे नाव घ्यावे लागते. यंदा भारत सासणेंच्या चाहत्यांसाठी आनंदाची खबर आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत दीपावलीच्या कथांमध्ये त्यांचे नाव दिसत असले, तरी दीर्घकथा अनुपस्थित होत्या. यंदा ‘प्रवाह’ या प्रवाही दीर्घकथेद्वारे सासणे पुन्हा फॉर्मात आले आहेत. चिरतरुण दुखांचे बुरूज खांद्यावर ओढून नेणारी अनपेक्षित माणसे या कथेतून अंगावर येतात. याशिवाय ‘कलेतील भारतीयत्व आणि स्वातंत्र्यलढा’ हा सुहास बहुळकर यांचा लेख कलारसिकांना उद्बोधक ठरेल. मुंबई- पुणे- नाशिक या विकासाची फळे चाखणार्या शहरांनजीक असूनही प्रगतीचे वारे अद्याप लांब असलेल्या भागांवर ‘सुवर्ण त्रिकोणाचा चौथा कोन’ ही युनिक फीचर्सची मालिकाही उल्लेखनीय ठरावी. सुबोध जावडेकर, संतोष शिंत्रे, मुकुंद टाकसाळे, अरुण वर्टी आदींच्या कथा, रामदास भटकळ, अनिल अवचट आदींचे ललित लेख, सतीश आळेकर यांची एकांकिका व ग्रेस, नाधोंपासून दासू वैद्यांपर्यंत नव्या-जुन्या कवींच्या कवितांनी हा अंक नटला आहे.