Summary of the Book
फ्लशबँक पद्धतीने सांगितलेली हि एक प्रेमकथा आहे.
मोहन आणि शोभा हे दोघे कादंबरीचे नायक-नायिका,
सनातनी कुटुंबातील मोहन आणि आधुनिक कुटुंबातील
शोभा अशा दोन परस्परविरोधी व्यक्तीचं सहजीवन लेखक
मनोहर यांनी कादंबरीत रंगविलं आहे. ते रंगवितानाच त्या वेळचा
काळ, सामाजिक वातावरण, कुटुंबपद्धती, परंपरा, आदींचं दर्शनही होतं.
या कहाणीत विविध व्यक्तिरेखा येतात. वाडा संस्कृतीपासून आकार्डीया
जहाजावरील वातावरण कथानकात उभं रहातं..