Summary of the Book
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या 16 वर्षे कार्यवाह आणि 34 वर्षे अध्यक्ष असलेल्या आवाबाई वाडिया यांचे चरित्र ज. शं. आपटे यांनी लिहिले आहे. कुटुंब नियोजनाच्या चळवळीत वाडिया यांनी ज्या निष्ठेने व तळमळीने काम केले त्याला कशाचीही उपमा नाही.
वाडिया यांनी असोसिएशनच्या शाखा देशभर उघडल्या. ज. शं. आपटे यांनी वाडिया यांच्यासमवेत असोसिएशनमध्ये काम केले आहे. वाडिया यांचे काम त्यांनी जवळून बघितले आहे. या छोटेखानी चरित्रात वाडिया यांचे अफाट काम लेखकाने नेमकेपणाने मांडले आहे. वाडिया यांनी आपल्या इच्छापत्रात असोसिएशनला आठ कोटी रुपयांची देणगी दिली होती. लोकसंख्येच्या नियंत्रणासंदर्भात तळमळीने काम करणाऱ्या वाडिया यांचे डोंगराएवढे काम या पुस्तकामुळे समजेल.