Summary of the Book
प्रसंगनिष्ठ आणि शाब्दिक विनोदाचे दिलखुलास दर्शन घडविणारा हा विनोदी कथासंग्रह आहे. पोलिसी खाक्या, धोबोपछाड, वदनी 'कवळी' घेता, गुरुजींची मनधरणी, दारूचं राजकारण, पँटची चोरी, अकलेचा कांदा, भोजनभाऊ, शेरास सव्वाशेर, सत्याचे प्रयोग, मनातला मुक्तछंद, काही रगेल आणि काही रंगेल पात्रे या १२ कथा दिवस प्रसन्न करतात. बहुतांश कथा या ग्रामीण पार्श्वभूमीच्या असल्याने माणसांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार येथे पहावयास मिळतात. शहरी नमुनेही भेटतात. डायरी हा धमाल प्रकार येथे वाचायला मिळतो. सरकारी कर्मचाऱ्याची डायरी, तरुणाची डायरी, गृहिणीची डायरी, कार्यकर्त्याची डायरी, व डायऱ्यांसह एका मंत्र्याचा खुसखुशीत दिनक्रमही वाचायला मिळतो.