Summary of the Book
करिअर म्हणजे काय, ते कसे असावे, आनंद देणारे, आयुष्य जपणारे, खुलवणारे, नाती जपणारे आणी महत्वाचे म्हणजे आवड जपणारे. स्वतःची क्षमता, आवड, अभिरुची, समजून निवडलेले,' असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे; परंतु करिअर निवडायचे कसे? दिपक बिचे यांनी या पुस्तकात याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राजहंस दडलेला असतो. त्याचा शोध घेणे महत्वाचे असते, असे ते म्हणतात. करिअर निवडताना काय करावे, दहावी बारावीनंतर काय करावे, कॉमर्स शाखेतील करिअर, स्वतंत्र व्यवसाय, वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखा, जीम व योगा ट्रेनर, संशोधन, परदेशी भाषांचा अभ्यास आदी क्षेत्रांत करिअर कसे करता येते, याची माहिती ते देतात. विविध वेबसाईटची माहितीही मिळते.