Summary of the Book
ओलावा हे पुस्तक लिहिताना यातील सर्वंच गोष्टी निसर्गाची विविधता, सौंदर्य, उदारता ही झाडे, फुले, पाने, वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामाईक आहे व त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे मनाला भासत राहिले.
मानवाप्रमाणे पाना-फुलांना, वृक्षवेलींना भावना असल्याच पाहिजेत परंतु त्यांना त्य व्यक्त करता येत नसाव्यात किंवा त्या भावना आपणास समजून घेत नसाव्यात असे वाटते.
अशा नाजूक व पर्यावरणासंबंधित व त्यांची जाणीव करून देणारया घटना या पुस्तकात आहेत. ही जाणीव असणारी अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली.
त्या जाणिवेपोटी त्या व्यक्तीने अशी काही मदत केली की ती मदत आज मला माझी आवश्यकता होऊन राहिली आहे.