Summary of the Book
मुळात गणितासारखा अवघड विषय आणि त्यात गणितातातील कोडी म्हणजे काठिण्याचा कळसच; परंतु ज्यांना गणिताविषयाची आवड आहे किंवा ज्यांची आव्हान स्वीकारण्याची तयारी आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक गमतीदार कोडे आणि कोड्यांची उकल आहे. दिलीप गोडखिंडीकर यांनी या पुस्तकात 'कुट प्रश्नांचा संग्रह', 'विचारधारा/मार्गदर्शक सुचना' आणि 'सविस्तर उकल' असे तीन विभाग केले आहेत.
पहिल्या भागात विचारलेले कुट प्रश्न हे काठिण्य पातळीच्या क्रमाने नाहीत. संबंधित प्रश्न सोडवण्याची मार्गदर्शक सुचना दुसऱ्या विभागात दिली आहे.
तिसऱ्या विभागात प्रश्न कसा सोडवला, त्याची उकल दिली आहे. गणित विषयाची आवड उत्पन्न करणारे हे पुस्तक आहे.