Summary of the Book
पाकसिद्धीचे तंत्र हे सर्वांनाच सहजसाद्य आहे. फक्त पदार्थ करण्यापेक्षा हमखास उत्तम होण्यात फरक आहे. पदार्थ उत्तम कसा होईल, याचा मंत्र जयश्री देशपांडे यांनी 'हमखास पाकसिद्धी'मधून दिला आहे. यासाठी पदार्थांची कृती, साहित्य हे देतानाच चांगला पदार्थ होण्यासाठी काय काळजी घ्यावी, याविषयी सूचना दिल्या आहेत. यानुसार पदार्थ केला तर तो हमखास चांगला होणारच, असा आत्मविश्वास लेखिकेला वाटतो.
सूप, स्टार्टर, सॅलेड, भाताचे प्रकार, पोळी व पोळीचे प्रकार, पालेभाज्या, नेहमीच्या भाज्या, भाज्यांचे वैशिट्यपूर्ण प्रकार, उसळी, आमटी, सार, कढी, कोशिंबीर,चटण्याचे प्रकार,कोरड्या चटण्या, ओल्या चटण्या, उपवासाचे पदार्थ, न्याहरीसाठी महाराष्ट्रीयन पदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, भेळपुरी, पिझ्झा, मधल्या वेळेचे पदार्थ, दिवाळीचा फराळ, लहान मुलांच्या डब्याचे पदार्थ सांगितले आहेत.
कॉर्नचे पदार्थ, पक्वाने, आइस्क्रीम, सरबते, सॉस, मसाले, मुरंबे, लोणची, पापड, चायनीज व कॉन्टीनेंटल, मुखशुद्दीचे प्रकार अशा शेकडो पदार्थांच्या कृतींना ही थाळी पुरेपूर भरली आहे. शिवाय ज्यांना सामिष भोजन आवडते त्यांच्यासाठी अंडी, मटण, खिमा, चिकन, मासे, यांचे विविध पदार्थ यात आहेत..