Hard Copy Price:
26% OFF R 65R 48
/ $
0.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
यशस्वी नाटककार होण्यासाठीची सर्व तयारी अत्रे साहेबांनी करूनसुद्धा त्यांनी व्यावसायिक नाटक लिहिले नाही,याची करणे आहेत .ती करणे अत्रे साहेबांनी सांगून ठेवली आहेत. ती करणे अत्रे साहेबांसारख्या श्रेष्ठतम गुणवत्तेच्या व त्या काळातही प्रसिद्ध व लोकप्रिय असलेल्या व्यक्तित्वाला साजेशी आहेत. शिक्षणशास्त्राचे तज्ज्ञ , हजारो शिक्षकांना अध्यापनशास्त्राचे धडे देणारे आचार्य, पाठ्यपुस्तकांचे लेखक व संपादक , नियत कालिकांचे संपादक ,लोकप्रिय लेखक ,विद्वान ,सुशिक्षित व सामान्य श्रोत्यांध्ये लोकप्रिय असलेले विनोदी वक्ते असलेल्या आचार्य अत्रे यांची व्यावसायिक नाटक लिहिण्यासंदर्भातली वैचारिकता त्यांना साजेशीच होती. व्यावसायिक नाटक मंडळींनी स्वतःहून नाटक मागितल्याशिवाय नाटक लिहायचे कष्ट का घ्यायचे ,हा अत्रे साहेबांच्या मनातील प्रश्न होता. तसेच स्वतःहून व्यावसायिक नाटक लिहायचे आणि त्या नाटकाच्या हस्तलिखिताचे बाड घेऊन ,व्यावसायिक नाटक कंपन्यांचे उंबरठे झिजवायचे किंवा त्या काळातील प्रसिद्ध ,सुस्थितीतील व्यावसायिक नाटक मंडळ्यांच्या अहंमन्य व्यावस्थापक व अर्धशिक्षित नटांच्या मिनतवाऱ्या करायच्या ,हे अत्रे साहेबांसारख्या ,त्या काळातसुद्धा लोकप्रिय , उच्चशिक्षित प्रसिद्ध व यशस्वी व्यक्तीला स्वतःच्या उभरत्या वयात पटणारे नव्हते व पचणारे नव्हते . म्हणून खडतर प्रयत्नांनी यश व कीर्ती मिळवणाऱ्या स्वतंत्र व मानी वृत्तीच्या अत्रे साहेबांनी व्यावसायिक नाटक लिहिलेले नव्हते.अत्रे साहेबांचा या संदर्भातील विचार व आचार त्यांच्या व्यक्तित्वाला साजेसाच होता.