Summary of the Book
या पुस्तकात खादी ग्रामोद्योगाच्या योजना, मधमाशापालान, बदक पालन, वराह पालन, गांडूळ कल्चर व गांडूळ खत निर्मिती, शेळीपालन, किसान रोपवाटिका या व्यवसायाबरोबर कृषिपदवीधरांसाठी एग्रीक्लिनिक व एग्री बिझनेस ते रेशीम उद्योग, व्यवसायाबाबत तपशिलवार माहिती देणारी ४२ प्रकरणे असून शेतीपूरक टोमॅटो प्रक्रिया, केळी प्रक्रिया, काजु प्रक्रिया, आंबा उद्योग, आवळा उद्योग, आदि उद्योगांची प्रारंभापासून ते विक्रीपर्यंतची माहिती दिली आहे. ग्रामीण पुरुष व महिलांना हे पुस्तक उपयुक्त तर वाटेलच इतकेच नव्हे तर पुस्तक वाचल्यानंतर आपल्या ग्रामीण भागात नवीन व्यवसायास सहज प्रारंभ करू शकतील अशी परिपूर्ण माहिती लेखकाने पुस्तकात दिली आहे.