Summary of the Book
अरुणा सबाने यांचे हे बारावे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या आणि आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीवर लिहिले आहे. आपुलकीचा झरा आणि अतीव जिव्हाळ्याने लिहिलेली ही व्यक्तिचित्रे मनाला भिडतात.
घरातील पाळीव प्राण्यांपैकी डायना कुत्रीवरचा त्यांचा लेख ते ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावरचा लेख, असे सारे लेख छान जमलेले आहेत. चपखल शीर्षके आणि नेमके वर्णन यामुळे सगळीच मंडळी लख्खपणे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. इंदिरा गांधी, दुर्गा भागवत, सामाजिक कार्यकर्त्या सीमा साखरे अशी सर्व थरांतील व क्षेत्रांतील मंडळी या पुस्तकातून भेटतात.