Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
रमेश तोडकर व्यवसायाने आर्किटेक्ट. कथालेखनाची आवड असलेल्या रमेशला साहित्यिक वाईकर यांच्या निधनानंतर त्यांची अपूर्ण राहिलेली कथा पूर्ण करण्याची संधी अनपेक्षितपणे मिळते. त्यासाठी तो नाशिक येथे वाईकर यांची पत्नी विजयाला भेटतो. त्यांच्या घरातील वास्तव्यात त्याला विचित्र अनुभव येतात, भास होतात. विजयालाही असे अनुभव आल्याचे ती सांगते. वाईकर यांच्या हस्तलिखितामध्येही रमेशला काही तरी वेगळे वाटते. या सर्व गोष्टींचा शोध घेत असताना वाईकर यांचा बंगला पछाडलेला असल्याचे पुराव्यानिशी सिध्द होते. तो, विजया, त्याचा मित्र रवीन्द्रन, रियल ईस्टेट व्हॅल्युअर फडणीस, चोरीच्या इराद्याने आत गेलेला वस्वप्पा यांनी बंगल्यात काय अघटीत, अनैसर्गिक पाहिले, त्यांचा सगळ्यांवर काय परिणाम झाला, बंगल्यात घडणाऱ्या घटनांमागे नेमके काय असेल, त्या झपाटलेल्या वास्तूतील व्यक्तींची सुटका कशी होते, याचे रहस्यमय वर्णन नारायण धारप यांच्या 'प्राध्यापक वाईकरांची कथा'मधून आले आहे. धारपांची हि भयकथा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आहे. ती वाचताना वाचकही त्या वातावरणाचाच एक भाग बनून जातो.
मी काही पोचलेला रसिक नाही. मला ही कादंबरी आवडली. जरा लांबलेली आहे, आणि जास्त भीतीदायक नाही. पण मला तसं काहीही आवडतं 😐
Rohan Naik
01 Mar 2020 05 30 AM
अपेक्षा भंग करणारी कादंबरी .भय आणि गुड यांचा लवलेश फारच कमी आहे .एकच प्रसंग पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्द कोशात जुळवून कादंबरीची लांबणी वाढवत नेली आहे.नंतर नंतर तर ही कादंबरी एक प्रेमी जोडप्यांना एकत्र कसे आणले जाते याकडे झुकली आहे .
NIKHIL CHIPLUNKAR
26/12/2016
It is very interesting book. You have to read once.
It permanently stored in my personal library. Lots of tweets and turns.