Summary of the Book
आईपण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. त्यामुळे त्या स्त्रीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. त्यातून पोटी जन्मलेली लेकच असेल, तर त्या आईपणाचा अर्थही निराळाच असतो. अस्मिता जोगदंड-चांदणे यांनी त्यांच्या या कवितासंग्रहात याच भावनांना काव्यरूपात गुंफलं आहे. लेकीच्या बालसुलभ लीला, मातृत्वाचं देणं याबरोबरच समाजात होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्त्येसारख्या गोष्टींवरही त्यांनी कवितांमधून भाष्य केलं आहे.