Summary of the Book
अलीकडच्या काळात साहित्त्यातील विनोदी लेखन हा प्रकार कमी होत असलेला दिसतो. त्यामुळे सु. ल. खुटवड यांनी
संपादित केलेलं हे पुस्तक आवर्जून हातात घ्यावसं वाटत.आणि वाचून झाल्यावर मन प्रसन्न करतं. पुस्तकात एकुण
४८ कथांचा समावेश आहे. या कथांमध्ये प्रामुख्याने शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदावर भर आहे.
जीवनात 'विनोदा'ला महत्वाचे स्थान असते. नेहमीच्या जगण्यात विनोदाचा शिडकावा मन तरतरीत करतो.
अगदी काम करताना, गप्पा मारताना होणारे प्रासंगिक, हलकेफुलके विनोद यामुळे मन आनंदीत होते; पण चांगले, दर्जेदार विनोदी लेखन वाचायला मिळत नाहीत, अशी तक्रार अनेकदा ऐकायला मिळते. विनोदी लिखाण सोपे नसते; पण 'निवडक गुदगुल्या' यातील कथा या शिक्षक, डॉक्टर, व्यावसायिक, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा विविध घटकांनी लिहिलेल्या असल्याने यातील प्रत्येक कथा वेगळी आहे, विनोद वेगळे आहेत. ग्रामीण व शहरी बाजाच्या या कथा वाचताना चेहऱ्यावर हास्य फुलवितात. निखळ मनोरंजन करतात.
मुकुंद टाकसाळे, प्रा. वसंत मिरासदार, विजय कापडी, व. बा. बोधे, योगेश कुटे,प्रा. राहुल खरात, बंडा जोशी, जयश्री पाचकाळे,
विद्या शेटे,राजेंद्र बालगुडे, सुरेश पोरे अशा नव्या - जुन्या लेखकांनी या मैफिलीत उपस्थिती लावली आहे. गुणवत्ता आणि
तोल राखून केलेलं हे लेखन पुन्हा पुन्हा वाचावं असं.!!