Summary of the Book
अक्षांश - रेखांश, दिशा, नकाशे हे शब्द ऐकले तर कोणाला अगदी कांटाळवाणे वाटेल. मात्र हा कांटाळवाणा वाटणारा विषयच डॉ. प्रकाश जोशी यांनी अत्यंत रंजक पद्धतीने मांडला आहे. डॉ. जोशी यांना भटकंतीची आवड आहे.
या आवडीतून ते भरपूर प्रवास केला. खरे तर डोळस प्रवास केला. नकाशांचा उत्तम उपयोग कसा करावा, ते त्यांच्याकडूनच शिकावे. नकाशा कसा पाहावा, त्याचा उपयोग कसा करावा, ईगल्स व्ह्यू म्हणजे काय आदी गोष्टींचे मार्गदर्शन त्यांनी पुस्तकातून केले आहे.
पुस्तकात भूकंपप्रवण नकाशा, चुंबकीय तीव्रता नकाशा, ऋतूनुसार, वेळेनुसार, जनगणना, आकाशदर्शन नकाशा अशा नकाशांचा समावेश केला आहे. नकाशाचे तंत्र आणि मंत्र शिकवणारे हे पुस्तक आगळेवेगळेच म्हणावे लागेल