Hard Copy Price:
R 200
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
"स्वत:च्या जगण्यावर स्वत:चा हक्क असायला हवा", हे जीवनतत्त्व म्हणून न्याय्य व उदात्त असलं तरी वास्तवात त्याच्या आविष्काराचं दर्शनही दुर्मिळ आहे. माणसाच्या प्रत्येक क्षणाला इतरांच्या अस्तित्वाचे संदर्भ असतात. एखाद्याच्या जगण्यातलं यशापयश, इच्छांची पूर्ती-अपूर्ती हे केवळ त्याच्या वैयक्तिक गुणावगुणांवर, कौशल्यावर अवलंबून असतंच असं नाही तर इतरांच्या अस्तित्वाचे संदर्भही त्याबाबतीत महत्त्वपूर्ण ठरतात. असे संदर्भ कुटुंब आणि समाज पुरवित असतात. काहीजणांसाठी ते शिड्यांप्रमाणे लाभदायी ठरतात तर काहीजणांसाठी त्या बेड्या ठरतात. ज्यांच्यासाठी ते 'बेड्या' ठरले आहेत; अशा मनस्वी स्त्री, पुरुष आणि मुलांच्या विलक्षण कहाण्यांचा "सामक्षा’ हा संग्रह सुमेध वडावालांच्या अनोख्या शब्दकळेतून सिद्ध झाला आहे. सामान्यत: परिचित असणार्या व अपरिचित असणार्या अशा भिन्नभिन्न विश्वांचं कथांतून घडणारं आशयघन दर्शन हे स्तिमित करणारं आहे.