Summary of the Book
अनुराधा फाटक यांनी मुक्ताबाईच्या जीवनावर लिहिलेली ही कादंबरी वाचकाला नामदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या आध्यात्मिक मार्गातील वाटचालीची माहिती देते. लेखिकेनं इथं मुक्ताबाईंना आदिमायेचं रूप मानलं आहे. ज्ञानदेव, निवृत्तिनाथ, सोपानदेव व मुक्ता या चार भावंडाच्या प्रेमाचं चित्रण फाटक यांनी प्रभावीपणे केलं आहे. ओघवती शैली आणि भारदस्त भाषा ही या कादंबरीची वैशिष्ट्यं.