Summary of the Book
बब्रुवान रुद्रकंठावार यांच्या विनोदी लेखांचा हा संग्रह वाचकाला निखळ हास्याचा आनंद देतो. हे पुस्तक वाचताना वाचक काही गोष्टी जाणून आहे, हे लेखकाने गृहीत धरले आहे. बौद्धिक चातुर्य आणि ज्या काळात विनोद लिहिला गेला आहे तो काळ टिपणारा विनोद या लेखात आहे. या लेखांची जी भाषा आहे, ती बोली असली तरी एका ठिकाणची नाही. लेखकाने स्वत-ची अशी भाषा तयार केली आहे. वेगवेगळे विषय मांडून त्याच्यातून एक-एक कथानक प्रत्येक लेखात साकारलं आहे. हे लेख प्रतिक्रिया किंवा टिप्पणी करत केलेल्या विनोदाचा प्रकार नाही. या लेखनाचा बाज पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि त्यामुळेच वाचक त्यात रंगून जातो. लेखन कसे आहे आणि यातील विनोद कोणत्या प्रकारचा आहे, हे सांगणारी तंबी दुराई यांची प्रस्तावनाही छान आहे.