Summary of the Book
सम्यक् परिवर्तन म्हणजे योग्य किंवा सर्व कल्याणाच्या दिशेने होणारे परिवर्तन! परिवर्तनविरोध हा जीवनद्रोह आहे. हे सर्व वंचितांनी लक्षात घ्यावे; आपल्यावर गुलामी लादणाऱ्या सर्व शोषक संस्कारांना लाथाडावे आणि सम्यक् परिवर्तनाच्या प्रकाशवाटेवर स्वत:ला आणून उभे करावे. भारताचे संविधान आपल्या बाजूने, सम्यक् परिवर्तनाचा उद्घोष करीत उभे आहे. हे सर्व वंचितांना कळावे, त्यांनी भयमुक्त व्हावे आणि आपल्या ज्वलंत माणुसकीची प्रस्थापना करायला सुरुवात करावी अशी या ग्रंथाची मनापासून इच्छा आहे.