Summary of the Book
शालेय शिक्षण घेताना संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्याप्रमाणे इतिहास, भूगोल, गणित अशा अनेक विषयांचा चा आधार घेतला जातो व अभ्यास करून, विविध विषयांचं ज्ञान ग्रहण करून, स्वतःची बुद्धी विकसित केली जाते, त्याचप्रमाणे . शेअर बाजाराचा अभ्यास करताना फंडामेंटल, टेक्निकल, अर्थव्यवस्था व बाजाराविषयीची मानसिकता या विषयांचं ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. या पुस्तकात मी शेअर बाजाराविषयीची मानसिकता या विषयावरच जास्त भर दिला आहे. कारण आपला देशात आपल्या भाषांमध्ये शेअर बाजाराची प्राथमिक माहिती व ओळख सांगणाऱ्या काही पुस्तकांचं साहित्य बोटावर मोजण्या इतकाच आहे. परंतु बहरात असणाऱ्या लोकांच्या मानसिकते विषयी कोणतेही पुरेसे साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणूनच या विषयाची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. ज्याचा उपयोग वाचकांना चांगल्या प्रकारे होईल व शेअर बाजाराविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल.