Summary of the Book
"पद्मगंधा प्रकाशनाने' प्रसिद्ध केलेल्या डॉ. श्रीकांत वाघ यांच्या "संधिवात' या लेखसंग्रहामुळे एका जिव्हाळ्याच्या विषयासंबंधी वैज्ञानिक माहितीचे मोठे भांडार मराठी भाषेत प्रथमच उपलब्ध झाले आहे. हे सर्व लेख गेल्या काही वर्षात सकाळ "फॅमिली डॉक्टर' तसेच इतर नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत.
पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत. प्राथमिक माहितीच्या प्रकरणानंतर एकेका प्रकारच्या संधिवाताचे वर्णन येते. यात झीजेचा ऑस्टिओआरथ्रायटीस, हुमॅटॉइड आमवात, सोरियासिस, गाऊट, कंबरदुखी असे वेगवेगळे आजार आहेत. संधिवातासोबत वेदना येतेच. त्यामुळे वेदनेविषयीही एक स्वतंत्र प्रकरण आहे. व्यायामाचे उपयोग, आहाराचे पथ्य, योगासनांचे महत्त्व तसेच आयुर्वेदाचे स्थान यांच्या विस्तृत वर्णनाची प्रकरणे आहेत.