Summary of the Book
समकालीन स्त्रीवादी मराठी कादंबरीच्या क्षेत्रात समवयस्क लेखिकांचा विचार केला तर मेघना पेठे, कविता महाजन आणि अरुणा सबाने ह्या धीटपणे स्त्रियांच्या सर्वांगीण बाजू पारदर्शक आणि निर्भिडपणे मांडणाऱ्या स्त्री लेखिका अहेत. मेघना पेठे यांची नातिचरामि , कविता महाजन यांची ब्र , भिन्न आणि अरुणा सबाने यांची विमुकता , मुन्नी ह्या पाचही कृती समकालीन सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंभू असलेल्या स्त्री नायिकांच्या चरित्रकथा आहेत .
आधुनिक प्रगत जागतिकीकरणाच्या काळात खेड्यापाड्यात नगरात-महानगरात-आदिवासी कोर एरियात काम करणाऱ्या सर्वच स्तरातल्या स्त्री जीवनाचे समकालीन वास्तव मांडले आहे . केवळ स्त्रीवादीच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यात मेघना पेठे, कविता महाजन आणि अरुणा सबाने यांच्या कादंबऱ्यानी स्त्रीत्वाचे ऊर्जित रूप अधोरेखित केले आहे ….