Summary of the Book
डॉ. महेंद्र कदम हे समीक्षाक्षेत्रात आवराने घेतलं जाणारं नाव आहे, त्यांना भाषाविज्ञानातील तत्त्वे, वाड्मयप्रकारांची परंपरा, वाड्मयीन निकष, सौंदर्यात्मक दृष्टी आदी बाबींचा उत्तम जाण आहे. या जाणिवेच्या बळावर डॉ. महेंद्र कदम यांनी प्रस्तुत ग्रंथात १९८० नंतरच्या कवितेचा एक व्यापक पट कवेत घेऊन कविता कशी वाचावी आणि तिचे कवित्व कसे तपासावे याचे शैलीवैज्ञानिक विश्लेषण आकलनसुलभ भाषेत करून दिले आहे.
हे आकलन १९८० नंतरच्या महानगरीय, दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी प्रवाहांमधील निवडक कवींच्या कवितेचा अभ्यास करून, डॉ. महेंद्र कदम यांनी शैलीतील वैविध्य व वैशिष्ट्ये काय आहेत, याची अभ्यासपूर्ण मांडणी या ग्रंथात केली आहे. डॉ. महेंद्र कदम यांच्या मताप्रमाणे शैलीविज्ञान हे कलाकृतीची संपुर्ण, सर्वांगीण समीक्षा करू शकत नसले, तरी कलाकृतीच्या मूल्यमापनाचे मानदंड मात्र निश्चितपणे पुरवू शकते. त्यांचे हे मत 'कवितेची शैली' या ग्रंथात प्रतिबिंबित झाल्याची प्रचिती वाचकांना नक्कीच येईल, असा विश्वास वाटतो.