Summary of the Book
इंग्रजीतील लोकप्रिय लेखन सिडनी शेल्डन यांची ही गाजलेली कादंबरी. विजय देवधर यांनी कादंबरीचा अनुवाद केला आहे. मानवी मनोव्यापारावर रचेलेली गुंग करणारी ही कथा आहे. कादंबरीचा नायक डॉ. ज्यूड सिव्हन्स हा एक मनोविश्लेषण तज्ञ आहे. मनोविकृती असलेल्या रुग्णांवर मानसोपचार करणे हे त्याचे काम असते.
एक दिवस हिच विकृती त्याच्या जीवावर उठते. तेव्हा काय होते, त्याचीच ही कथा आहे. पहिल्यांदा त्याच्या एका पेशंटचा खून होतो. मग त्याच्या रिसेप्शनीस्टची हत्त्या होते. या सगळ्यावर पोलीसही विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. अखेर तो अज्ञात खुनी कोण याचा शोध ज्यूडच घेतो. या शोधाचीही ही कथा आहे.