Summary of the Book
‘लठ्ठपणा- न कळणारा आजार’ या विशेष विभागाने यंदाचा शतायुषी सजला आहे. शतायुषीचे यंदाचे ३३ वे वर्ष. या अंकामध्ये लठ्ठपणामुळे होणारे आजार, त्याची कारणे, तपासण्या, उपचार आदी लठ्ठपणाची माहिती चौदा नामवंत डॉक्टरांच्या लेखांद्वारे वाचकाला मिळते. याबरोबरच आधुनिक युगातील पंचतंत्र कथा, तरुण-तरुणींचे प्रश्न, लहान मुलांसाठी रंगीत बालचित्रकथा आदी या अंकात आहेत. मूल न होणार्या स्त्रियांसाठी सुरू केलेल्या मालिकेतील ‘व्यंधत्व आणि सोनोग्राफी’च्या विशेष भागाशिवाय धाप लागणारे मूल, अन्नपदार्थातील भेसळ, कानात बसलेला दडा, राग-आजार आणि आरोग्य, हार्ट ट्रान्सप्लांट, अॅक्युपंक्चर यावरील माहितीपूर्ण लेख या अंकात वाचायला मिळतात.