Summary of the Book
संझगिरी यांनी विविध वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह ‘चॅम्पियन’ नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला आहे. स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवणा-या खेळाडूंच्या कारकीर्दीची थोडक्यात आणि नेमकी ओळख या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. हे ‘चॅम्पियन्स’ क्रिकेटच नाही, तर वेगवेगळ्या खेळातील असल्यामुळे हे पुस्तक सर्वसमावेशक झाले आहे.