Summary of the Book
अतिशय अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकात मी खूप काही शिकलो. मला वाटते कि हे पुस्तक सर्वांनीच अवश्य वाचावे. - डॉ. माधव गाडगीळ, पद्मभूषण, पर्यावरणतज्ञ
डॉ अच्युत गोडबोलेंच्या या महत्वाच्या ग्रंथात, सध्याच्या 'विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या' बाबतीत मुलभूत स्वरूपाचे प्रश्न उभे केले आहेत. प्रत्येकाने वाचवा असा हा कसदार ग्रंथ उतरला आहे. - प्रो. गणेश देवी, पद्मश्री, भाषातज्ञ आणि जेष्ठ विचारवंत
...अनर्थच पुढे निपजता ठेवणारी आर्थिक ध्येयधोरणे सर्वसामान्यांपुढे सोप्या भाषेत तपशीलवार उघडून दाखवणारा हा अर्थ - पूर्ण ग्रंथ आहे. - मेधा पाटकर, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता
एकाच वेळी आश्वासक आणि घाबरवणारी मांडणी. - नंदा खरे, सुप्रसिद्ध लेखक
आज ... कोट्यावधी सामान्य नागरिकांना अनुभवाला येणाऱ्या अनर्थसदृश्य परिस्थितीची मुले दोषी वैचारिक प्रमेयांत आहेत हे या पुस्तकात भरपूर अद्ययावत आकडेवारी आणि संदर्भासहित दाखवून देण्यात आले आहे. - प्रो. संजीव चांदोरकर, टी. आय. एस. एस. मुंबई, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थविषयक अभ्यासक
अच्युत गोडबोलेंचे हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. - मिलिंद मुरुगकर, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थशास्त्र अभ्यासक
सध्याचा 'विकास' हा वास्तवात निसर्गाचा - आणि स्वतःचाही - विनाश आहे. अच्युत गोडबोले ह्यांनी या ग्रंथात यासठी ढीगभर पुरावे दिलेले आहेत. - दिलीप कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता
अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे 'अनर्थ' एक वेगळा 'अर्थ' नक्कीच आपल्यासमोर आणले. - डॉ. मानसी गोरे, प्रो. अर्थशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा विचार करायला लावणार पुस्तक म्हणजे 'अनर्थ' - मुक्ता मनोहर, सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
श्री.अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकाद्वारे विकासाच्या सध्याच्या प्रचलित संकल्पनेवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे... - अबिजीत घोरपडे, संपादक, 'भवताल' , पर्यावरण अभ्यासक
भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ट ग्रंथ! - प्रो.श्रीनिवास खांदेवाले, प्रसिद्ध अर्थतज्ञ
या पुस्तकातील आकडेवारी व विश्लेषण सरकार आणि समाजाची झोप उडवणारी आहे. - उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्या