Summary of the Book
महानगर हैदराबाद, ऐतिहासिक हैदराबाद, उर्दू भाषा जपणारे अदबशीर हैदराबाद, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले हैदराबाद अशी या शहराची विविधांगी ओळख आहे. ही आणि हैदराबादबद्दलची आणखी माहिती जाणून घ्यायची असेल, तर धनंजय कुलकर्णी यांचं हे पुस्तक वाटाड्यचं काम करते. मात्र, ही केवळ ओळख नाही, हैदराबादकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टीही ते देतात. हैदराबादच्या या कथेला 'हैदराबादी वहेदियात'पासून सुरवात होते. त्यानंतर १८५७ चा अखेरचा सेनानी, राजा दीनदयाळ, लैलाची कथा, उर्दू पत्रकारितेतील मराठी मुशाफिरी, निजामाच्या स्वप्नांचा दयनीय साक्षीदार, मायाबाजार, नबाबी हैदराबादी असे टप्प्याटप्प्याने शहर उलगडत जाते. त्यात समाजकारण, राजकारण, भाषा, संगीत, संस्कृती अगदी रेल्वेने घडविलेला चमत्कारही येतो. आजच्या घडीला आय. टी. क्षेत्रात स्वतःचा ब्रँड निर्माण करणाऱ्या हैदराबादचे हे रोचक अंतरंग आहे.